राज्यशास्त्र विभाग - वार्षिक अहवाल 2018 -19
सन 2018-19 या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम
राबनिण्यात आले.
1. बीए भाग तीन च्या
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधी या संदर्भात मार्गदर्शन पर
कार्यक्रम घेण्यात आला. माननीय धायगुडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
2.
25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांना
घेऊन मतदार जनजागृती अभियान संबंधी रॅली काढण्यात आली.
3.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त राज्यशास्त्र विभागाने लोकमान्य
टिळक जीवन व कार्य भितीपत्रिका आयोजित केली होती या भीतीपत्रिकेचे उद्घाटन एडवोकेट
सोशंटे मॅडम व प्राचार्य डॉक्टर आर्वी शेजवळ सर यांच्या उपस्थितीत उद्घाटन घेण्यात
आले.
4.
गांधी विचार संस्कार परीक्षा राज्यशास्त्र विभागाच्या वतीने
जयंतीनिमित्त घेण्यात आली, गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही
परीक्षा आयोजित करण्यात आली.
5.
राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी आणि बीए भाग एक व दोन मधील
विद्यार्थी यांना महाविद्यालयातील ग्रंथालयात पुस्तकांची देव-देव संबंधित व
महाविद्यालयातील ग्रंथालय संबंधी माहिती देण्यासाठी भेट देण्यात आली.
राज्यशास्त्र विभाग - वार्षिक अहवाल 2019-20
सन 2019-20 या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम
राबनिण्यात आले.
1. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त भित्तिपत्रिकाचे आयोजन विभागाने
केले याचे प्रमुख उद्घाटन माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर.
2. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व लालबहादूर शास्त्री महाविद्यालय यांच्या राज्यशास्त्र
विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार आणि संस्कार या परीक्षेचे आयोजन
करण्यात आले होते. या परीक्षेत कुमारी शिवकन्या ठोंबरे या विद्यार्थिनीने सातारा
जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळविला होता.
3. महाविद्यालयात सामाजिक शास्त्र विभाग मार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले
होते. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर कॅप्टन महेश गायकवाड सर
यांनी लोकशाही आणि निवडणुका या विषयावरती व्याख्यान दिले.
4. 26 नोव्हेंबर 2019 रोजी संविधान दिन निमित्य
भितीपत्रिका राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केली याचे प्रमुख उद्घाटक उप
प्राचार्य डॉक्टर माने मॅडम ह्या होत्या.
राज्यशास्त्र
विभाग - वार्षिक अहवाल 2020-21
सन 2020-21या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम
राबनिण्यात आले.
1. 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त राज्यशास्त्र विभागाने ऑनलाइन प्रश्नमंजुषा
कार्यक्रम आयोजित केलेला होता.
2. 26 नोव्हेंबर या संविधान दिना दिवशी ऑनलाइन व्याख्यान राज्यशास्त्र विभागाने
आयोजित केले होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर मनोज जाधव राज्यशास्त्र
विभाग प्रमुख व अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर हे होते.
राज्यशास्त्र
विभाग - वार्षिक अहवाल 2021-22
सन 2021-22 या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबनिण्यात आले.
1. दिनांक 2 ऑक्टोबर 2021
रोजी गांधी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावरील
ऑनलाइन प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आले होते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई सर्टिफिकेट देण्यात
आले.
2.
राज्यशास्त्र विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर 2021
रोजी संविधान दिना निमित्त
पत्रिके चे आयोजन करण्यात आले होते.संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या
संविधान रॅली मध्ये राज्यशास्त्र विभागातील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
3.
दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त विभागामार्फत भित्ती पत्रिकेचे आयोजन करण्यात आले
होते.
4.दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी
विभागामार्फत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त
विभागामार्फत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्राध्यापक
स्वप्नील औटे हे होते.
5.
दि.16 डिसेंबर 2021 रोजी
युवक बिरादरी मुंबई व एम आय टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे व मुंबई विभागीय अभिरुप युवा
संसद स्पर्धेमध्ये राज्यशास्त्र विभागातील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अभिरुप युवा संसद स्पर्धेमध्ये पुणे व मुंबई
विभागामध्ये महाविद्यालयाला पाचवा नंबर
प्राप्त झाला.महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता महामुलकर च्या
नेतृत्वाखाली महाविद्यालयाने सहभाग नोंदवला.
6.
दिनांक 22 डिसेंबर 2021रोजी
राज्यशास्त्र विभागामार्फत ग्रंथालय भेट आयोजित करण्यात आली होती
7.
दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला राष्ट्रीय मतदार दिना निमित्त भित्ती पत्रिकेचे
आयोजन करण्यात आले होते.माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे
कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या हस्ते वृत्ती पत्रिकेचे उद्घाटन करण्यात
आले.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागामार्फत ऑनलाइन
प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते सर्व
सहभागी विद्यार्थ्यांना विभागामार्फत ई-प्रमाणपत्र
प्रदान करण्यात आले.
8.
दि 30 मार्च 2022 रोजी
अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत राज्यशास्त्र विभागाने स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे
आयोजन केले होते.सदर कार्यशाळेसाठी
माननीय अजिंक्य नितीन गोडसे (सायकोथेरपी विभाग प्रमुख डॉक्टर
हेडगेवार रुग्णालय इचलकरंजी) हे प्रमुख वक्ते लाभले
होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय प्राचार्य डॉक्टर आर व्ही शेजवळ सहसचिव-प्रशासन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था
कोल्हापूर यांनी भूषविले.
9.
दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व लालबहादूर शास्त्री महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित केलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये
विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थिनी श्रुती संतोष शिंदे (बीए भाग एक वर्ष विभाग)
सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.महाविद्यालयाचा विद्यार्थी दिनेश रामविलास
गुप्ता (बीए भाग 2 विभाग) सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
Comments
Post a Comment